सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली

On: November 7, 2025 4:00 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी यांनी तडकाफडकी बदली केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून फलटण शहरात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत ढासळलेली होती. अनेक अवैध धंद्यांना उधाण आले होते आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहरातील डी.जे. प्रकरण आणि चक्री व्यवसायाला शहर पोलीस आणि पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा हे जबाबदार असल्याचे वृत्त विविध माध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने ही बदली केली असल्याचे समजते.

हे ही वाचा  ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणी येथे नागरिकांच्या समस्या जागीच सुटल्या

दरम्यान, आता फलटण शहरात हजर होणारे नूतन पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्यासमोर शहरातील मटका-जुगार, चक्री, अवैध धंदे, वाहतूक कोंडी, घरफोडी, चोरी, लुटमार, रोडरोमियो त्रास,मुलींची छेडछाड, वाहन चोरी आणि फसवणूक यांसारख्या वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्याचे मोठे आव्हान आहे.फलटण शहरातील नागरिकांचे लक्ष आता नव्या पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्या कामगिरीकडे लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

  मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे – मुख्याधिकारी निखिल जाधव

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणी येथे नागरिकांच्या समस्या जागीच सुटल्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फलटणमधील जाहीर सभेच्या दिवशीच उघड्यावर जुगार! पोलिसांचा कारभार प्रश्नचिन्हात

“वंदे मातरम्”ला दीडशतक पूर्ण, फलटण येथे समूह गीत गायन

पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

error: Content is protected !!