सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फलटणमधील जाहीर सभेच्या दिवशीच उघड्यावर जुगार! पोलिसांचा कारभार प्रश्नचिन्हात

On: November 28, 2025 3:14 PM
Follow Us:

फलटण – शहरातील चक्री जुगारांविषयी वारंवार माध्यमांमध्ये बातम्या झळकत असूनही फलटण पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची स्थिती कायम आहे. चोरीछुप्या पद्धतीने सुरू असलेला जुगार व्यवसाय आता प्रत्यक्ष रस्त्यावर उघडपणे सुरू होताना दिसत आहे. विशेष म्हणजे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची फलटणमध्ये जाहीर सभा असताना, फलटण एसटी स्टँडजवळील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात उपळेकर डायनिंग सेंटर विरुद्ध बाजूला स्टॅन्डच्या भिंतीला लागून  छत्री व टेबल टाकून निर्भयपणे जुगार सुरू असल्याचे चित्र दिसले.

या ठिकाणालगतच फलटणमधील एक प्रमुख शैक्षणिक हायस्कूल असल्याने विद्यार्थ्यांवर याचा विपरीत परिणाम होत असण्याची शक्यता असूनही पोलिस प्रशासन कोणतीही दखल घेताना दिसत नाही. तक्रारदारांनी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विशाल खांबे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांना माहिती दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. फलटण शहर पोलीस स्टेशनचा व पोलीस अधिकाऱ्यांचा हा निष्काळजी कारभार कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरत आहे.

हे ही वाचा  फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

क्रमश :

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

साताऱ्यात 14 ते 15 मे रोजी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा; प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

निखिल पिंगळे साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक; तुषार दोशी यांची बदली

छत्रपती शिवाजी वाचनालय वेळेत सुरू होत नाही; वाचकांची नाराजी

फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

  मुख्याधिकारी निखिल जाधवांचा अल्टिमेटम: ३१ जानेवारीपर्यंत नळ कनेक्शन नियमित करा

फलटण शहरातील सर्व मालमत्ता धारकांनी सन २०२५–२६ या आर्थिक वर्षासह थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी तात्काळ भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे – मुख्याधिकारी निखिल जाधव

error: Content is protected !!