सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला फलटण तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; विडणी येथे नागरिकांच्या समस्या जागीच सुटल्या

On: January 8, 2026 1:14 PM
Follow Us:

फलटण – माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि लोकप्रिय आमदार सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून फलटण तालुक्यातील निरा देवघर लाभक्षेत्रातील गावांमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या उपक्रमाला नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आज विडणी येथे झालेल्या दौऱ्यात शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रलंबित समस्या प्रत्यक्ष जागीच सोडविण्यात आल्या.
या उपक्रमांतर्गत नीरा देवघर पाणी वितरण व्यवस्था, महसूल, कृषी, महावितरण, पोलीस प्रशासन, पंचायत समितीचे विविध विभाग, पशुवैद्यकीय, आरोग्य, महिला व बालकल्याण, वन विभाग, जलसंधारण, धोम बालकवडी, नीरा उजवा कालवा, सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासन), सामाजिक वनीकरण, शिक्षण, जीवन प्राधिकरण, पाणीपुरवठा, भू-अभिलेख, परिवहन महामंडळ, एनएचएआय (पालखी महामार्ग), रेल्वे प्रशासन, पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नियोजित दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकून घेत अनेक प्रश्नांचे तात्काळ निराकरण करण्यात आले. जे प्रश्न तातडीने सोडविणे शक्य नव्हते, त्याबाबत संबंधित विभागांचे अधिकारी व नागरिकांची संयुक्त बैठक घेऊन ठोस तोडगा काढण्याचे स्पष्ट निर्देश आमदार सचिन पाटील यांनी दिले. आतापर्यंत तब्बल ४१ गावांमध्ये हा दौरा पार पडला असून, प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा मोठा सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. “असा आमदार आम्ही यापूर्वी कधी पाहिला नाही,” अशा शब्दांत नागरिकांनी आमदार सचिन पाटील यांचे आभार मानत गौरवोद्गार काढले.

हे ही वाचा  फलटण नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीवर हरकत दाखल करताना रहिवासी पुरावा जोडणे आवश्यक - मुख्याधिकारी निखिल जाधव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आसू फाट्यावर आमदार सचिन पाटील यांच्याकडून स्वागत

साताऱ्यात 14 ते 15 मे रोजी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा; प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

निखिल पिंगळे साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक; तुषार दोशी यांची बदली

छत्रपती शिवाजी वाचनालय वेळेत सुरू होत नाही; वाचकांची नाराजी

फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

error: Content is protected !!