फलटण – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ अभियानाचा टप्पा १ राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यानुसार फलटण तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांचा उद्देश नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा करणे, अर्ज निकाली काढणे तसेच विविध दाखले, नोंदी व दुरुस्त्या तत्काळ करून देणे हा आहे. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक तालुक्यातील मंडळ स्तरावर ही शिबिरे घेतली जात आहेत.
फलटण तालुक्यातील विविध मंडळांमध्ये मार्च २०२६ दरम्यान ही शिबिरे आयोजित करण्यात येणार असून संबंधित ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय, मंदिर परिसर किंवा सार्वजनिक स्थळी शिबिर भरविण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या संबंधित मंडळाच्या तारखेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
*शिबिरात मिळणाऱ्या सेवा*
या महसूल समाधान शिबिरात खालीलप्रमाणे सेवा पुरविण्यात येणार आहेत :
* ७/१२ उतारा, फेरफार नोंद, वारस नोंद, दुरुस्ती अर्ज
* उत्पन्न, जात, रहिवासी आदी दाखल्यांसाठी अर्ज स्वीकार व मंजुरी
* विविध प्रलंबित महसूल प्रकरणांचा तातडीने निपटारा
* सामाजिक व आर्थिक योजनांबाबत मार्गदर्शन
* नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडणार असून स्थानिक स्तरावर नागरिकांना शासन सेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम आहे. फलटण तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
या अभियानामुळे ग्रामीण भागातील महसूल विषयक कामे वेगाने निकाली निघण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटणमध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल समाधान शिबीर’ : मार्चमध्ये मंडळनिहाय विशेष शिबिरे, नागरिकांनी घ्यावा लाभ: तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव
By Team LBNN
On: March 2, 2026 7:57 PM
---Advertisement---










