सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये भगवान बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे आयोजन

On: October 18, 2026 9:29 AM
Follow Us:

फलटण – दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी करण्यात आले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२५ यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात पूजनीय भन्ते विनयपाल महास्थविर, शेंगाव यांच्या उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना, सामूहिक बुद्ध वंदना, सुत्तपठण आणि जाहीर धम्मप्रवचन असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

हा सोहळा माता रमाई चौक, भीमस्मृती भूमी, बुद्ध विहार, शेरि मंगळवार पेठ, फलटण येथे सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होणार असून दुपारी १२.३० वाजता भोजनदानाचे आयोजन करण्यात आले आहे. भगवान गौतम बुद्धांचा शांती, करुणा व प्रज्ञेचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समता व बंधुतेचे विचार समाजात रुजविण्यासाठी आयोजित या सोहळ्यास धम्मप्रेमी, अनुयायी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे ही वाचा  सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड; उदयनराजे बिनविरोध, नितीन पाटलांचाही मार्ग मोकळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!