सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणचे नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे शेतकऱ्यांच्या बांधावर; धुमाळवाडी-गिरवीत पिकांच्या नुकसानीची केली पाहणी

On: September 30, 2026 9:59 PM
Follow Us:

फलटण : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यांमध्ये फलटण तालुक्याचाही समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पिकांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करण्यास प्रशासनाकडून सुरुवात झाली आहे.
त्याअनुषंगाने फलटणचे नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे यांनी धुमाळवाडी-गिरवी परिसरातील शेतांमध्ये प्रत्यक्ष जाऊन पिकांची पाहणी केली. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी सचिन जाधव यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.
पाहणीदरम्यान पिकांची सद्यस्थिती, पावसातील खंडामुळे झालेली संभाव्य पीक हानी तसेच शेतकऱ्यांच्या अडचणींची प्रत्यक्ष माहिती घेण्यात आली.
राज्य शासनाच्या दुष्काळ जाहीरनाम्यानुसार पीक नुकसानीची पाहणी व पंचनामे महसूल मंडळ स्तरावर करण्यात येणार असून, पिकांची प्रत्यक्ष स्थिती नोंदविण्यासोबतच आवश्यक ठिकाणी छायाचित्रे व GPS लोकेशन नोंदविण्याच्या प्रक्रियेलाही महत्त्व देण्यात आले आहे.

हे ही वाचा  सोनवडी खुर्द-बुद्रुक सोसायटीच्या चेअरमनपदी बबनराव गोडसेंची बिनविरोध निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!