सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

“माझी कन्या सभापती झाली” – कुमारी शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या निवडीनंतर मा.खा. रणजितसिंह ना. निंबाळकर यांची प्रतिक्रिया; भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याचा डाव उधळला?

On: March 16, 2026 9:23 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण : फलटण पंचायत समितीमध्ये सभापती पदासाठी मोठा राजकीय तिढा निर्माण झाला होता. १६ पंचायत समिती सदस्यांपैकी ८ सदस्य शिवसेनेचे, तर उर्वरित ८ सदस्यांमध्ये ५ भारतीय जनता पार्टी आणि ३ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य निवडून आले होते. त्यामुळे सभापती पदाचा निर्णय ईश्वरी चिठ्ठीवर होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
फलटण तालुक्यातील ८ जिल्हा परिषद गटांपैकी ५ गटांवर शिवसेनेने विजय मिळवला होता. तसेच पंचायत समितीच्या १६ पैकी ८ गणांवरही शिवसेनेचा भगवा फडकला होता. त्यामुळे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार पुनरागमन केल्याचे अनेक माध्यमांनी म्हटले होते.
दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्रित युती करून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती. दोन्ही पक्ष एकत्र असतानाही शिवसेनेला कमी जागांवर रोखण्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे निकालानंतर रामराजे समर्थकांनी आनंदोत्सव साजरा केला.
पंचायत समितीत ८-८ अशी समसमान स्थिती निर्माण झाल्याने सभापती पद शिवसेनेच्या पारड्यात पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य शिवसेनेला पाठिंबा देतील आणि शिवसेनेपेक्षा कमी सदस्य असूनही सभापती पद राष्ट्रवादीला देण्याची तयारी शिवसेनेकडून दर्शवली गेली असल्याची चर्चा होती.
मात्र, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी हा राजकीय डाव वेळीच ओळखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या तिन्ही सदस्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला. त्यामुळे फलटण पंचायत समितीत प्रथमच भारतीय जनता पार्टीचा सभापती बसवण्यात भाजपला यश आले.
या प्रक्रियेत कुमारी शिवांजली विक्रमसिंह भोसले यांना सभापतीपदाची संधी देण्यात आली. कुणबी मराठा आरक्षणाच्या संधीचा फायदा झाला. मात्र मूळ ओबीसी प्रवर्गातून विविध जाती समूहातून यानंतर नाराजी नाट्य सुरू झाले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले,
“फलटण पंचायत समितीची निवडणूक माझ्याच नेतृत्वाखाली लढवली गेली होती आणि  माझी कन्या सभापती झाली,” अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हे ही वाचा  धामोरी येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

भाजपचा सभापती तर शिवसेनेचे अमोल सस्ते हे उपसभापती पदी विराजमान झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!