फलटण : फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. शहरातील नगरपरिषद मालकीच्या इमारतींचे नामांतर करण्यासंबंधी ठराव क्र. ९ (सभागृह व इमारतींना महापुरुषांची नावे देणे) बहुमताने मंजूर करण्यात आला. यावर बोलत असताना सनी काकडे म्हणाले की,नगरपरिषद सभागृहाला व इमारतींना महापुरुषांची नावे हा फलटणच्या इतिहासातील ऐतिहासिक निर्णय आहे.
या निर्णयाचे स्वागत करत भीम अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या निर्णयाबद्दल मा.खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर, आमदार सचिन कांबळे पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले यांचे आभार मानण्यात आले.
या प्रसंगी नगरसेविका सौ सुपर्णा अहिवळे, सचिन अहिवळे, नगरसेविका सौ.मीनाताई काकडे, RPI चे विजय येवले, संजय निकाळजे, हरीश आप्पा काकडे,संजय गायकवाड, सागर सोरटे, प्रशांत काकडे, सनी मोरे, सुनील अहिवळे, विकी बोके, जीवन काकडे, वैभव मोहिते, किरण अहिवळे, पिंटू मोरे, अभिजित गायकवाड, मुकेश रणपिसे, प्रकाश मोरे आदी उपस्थित होते.












