सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पुरोगामी विचारांचा राजा – आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा)

On: June 13, 2026 9:54 PM
Follow Us:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्यकारभाराचा, छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वाभिमानाचा आणि रयतेप्रती असलेल्या निष्ठेचा वारसा लाभलेली ऐतिहासिक रामनगरी फलटण ही महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासातील एक सुवर्णपान आहे. या गौरवशाली परंपरेचा वारसा आधुनिक काळात आपल्या कार्यातून जपणारे आणि समाजहिताच्या कार्याला नवे आयाम देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा).

राजर्षी शाहू महाराजांची सामाजिक समतेची शिकवण, महात्मा फुले यांचा परिवर्तनवादी विचार आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची न्याय, समता व बंधुतेची भूमिका आपल्या जीवनात अंगीकारून समाजकारण करणारे बाबा हे खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारांचे राजे आहेत.

“नाईक निंबाळकर हीच फक्त माझी भावकी नाही, तर तालुक्यातील प्रत्येक सर्वसामान्य, वंचित, शोषित आणि दुर्बल घटक हीच माझी भावकी आहे,” असे ठामपणे सांगणारे बाबा हे केवळ एका घराण्याचे प्रमुख नसून हजारो कुटुंबांच्या विश्वासाचे केंद्र आहेत.

या घराण्याचा एक महान संस्कार म्हणजे “प्रजाजन हे अपत्यस्थानी आहेत.” राजा आणि प्रजा यांच्यातील नाते सत्तेचे नसून मायेचे, विश्वासाचे आणि जिव्हाळ्याचे असते, यावर त्यांचा दृढ विश्वास आहे.

मनमोहन राजवाड्याचे छत्र हे केवळ एका संस्थानाचे प्रतीक नसून सर्वसामान्य, गरीब, वंचित, अडचणीत सापडलेल्या लोकांसाठी मायेचे, विश्वासाचे आणि आधाराचे छत्र आहे, असा विश्वास लोकांच्या मनात आहे. जाती-पातींच्या पलीकडे जाऊन सर्व समाजघटकांना आपले मानणारे, गरीबाच्या घरी जाऊन आवडीने स्नेहभोजन करून सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे आणि सामान्य माणसात सहज मिसळणारे हे नेतृत्व खऱ्या अर्थाने लोकनेते आहे.

मनमोहन राजवाडा हा केवळ राजघराण्याचा निवास नाही, तर तो मानवतेचे मंदिर आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाच्या अडचणी ऐकल्या जातात, त्याला धीर दिला जातो आणि शक्य तितक्या तत्परतेने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. जात, धर्म, पंथ, पक्ष यापलीकडे जाऊन माणूस म्हणून प्रत्येकाला सन्मान देण्याची परंपरा या घराण्याने जपली आहे.

बाबांच्या एका शब्दाने, एका निर्णयाने आणि एका हस्तक्षेपाने कित्येक कुटुंबांचा उद्धार झाला आहे. अनेकांच्या संसाराला दिशा मिळाली आहे. अनेकांच्या डोळ्यातील अश्रू पुसले गेले आहेत. स्वतःच्या हक्काच्या जमिनीत गोरगरीब आणि वंचित कुटुंबांच्या वसाहती उभ्या करून त्यांनी समाजसेवेचा एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. म्हणूनच फलटण तालुक्यात प्रेमाने म्हटले जाते –

“हे घराणे फक्त इतिहास घडवणारे नाही, तर घर वसवणारे घराणे आहे.”

ज्यांच्या दारात आश्रय नव्हता त्यांना आधार, ज्यांच्याकडे घर नव्हते त्यांना निवारा आणि ज्यांच्या आयुष्यात अंधार होता त्यांना उजेड देण्याचे कार्य या घराण्याने सातत्याने केले आहे.

शिस्त, प्रेम, स्पष्टवक्तेपणा आणि कार्यक्षमता यांचा सुंदर मिलाफ म्हणजे बाबा. अडचण घेऊन आलेल्या व्यक्तीला केवळ आश्वासन न देता त्याच क्षणी त्याच्या समस्येच्या निराकरणासाठी प्रयत्न करणारे नेतृत्व आज दुर्मिळ आहे. शिस्तीच्या बाबतीत कठोर असले तरी मनाने अत्यंत मृदू आणि भावनिक असलेले बाबा दुसऱ्याचे दुःख स्वतःचे मानतात. एखाद्या कुटुंबावर संकट आले तर त्याची वेदना त्यांना स्वतःची वाटते.

फलटण तालुक्याचे “किंगमेकर” म्हणून ओळखले जाणारे बाबा यांनी आपल्या नेतृत्व कौशल्याने आणि दूरदृष्टीने माढा मतदारसंघाच्या राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मात्र त्यांच्यासाठी राजकारण हे सत्तेचे साधन नसून समाजसेवेचे माध्यम आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणचे चेअरमन म्हणून कार्य करताना त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि व्यापाऱ्यांना न्याय देण्याचे काम केले. “शेतकऱ्याच्या भाकरीशी कुणी खेळू नये” हा त्यांचा विचार आजही हजारो शेतकऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण करणारा आहे.

सर्व जाती-धर्मातील लोकांना आपले मानणारे, सामाजिक सलोखा जपणारे, स्नेहभोजनाच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश देणारे आणि सामान्य माणसात सहज मिसळणारे बाबा हे लोकांच्या मनातील खरे लोकनेते आहेत.

आज हजारो तरुणांना दिशा देणारे, गोरगरिबांच्या आशा-आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणारे बाबा हे फलटणच्या जनतेसाठी अभिमानाचे स्थान आहेत.

परंपरेचा गौरव, समाजसेवेची तळमळ, मानवतेची जपणूक, शिस्तीची कास आणि सर्वसामान्यांप्रती असलेली अपार माया यामुळे आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा) हे केवळ एका संस्थानाचे राजे नाहीत, तर जनतेच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे लोकनेते आहेत.

आपल्या कार्यातून समाजाला नवी दिशा देणाऱ्या, हजारो कुटुंबांचे आधारवड असणाऱ्या, मानवतेचे मंदिर उभे करणाऱ्या आणि “प्रजाजन हेच माझे कुटुंब” हा संस्कार जपणाऱ्या या लोकनेत्यास वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा

उदंड आयुष्य, निरोगी आरोग्य, अखंड यश आणि समाजसेवेची अधिकाधिक संधी लाभो, हीच श्रींच्या चरणी प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आदरणीय श्रीमंत रघुनाथराजे (बाबा) नाईक निंबाळकर

शब्दांकन – प्रा राजेश सुर्यकांत निकाळजे
सोनगाव

हे ही वाचा  मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे विश्वासू सोशल मीडिया प्रमुख किसनजी गुप्ता यांचा वाढदिवस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!