दूध डेअरी, बेकरी आणि अन्न उत्पादन उद्योगांची सखोल तपासणी करण्याची अपेक्षा
फलटण : राज्यभर अन्न व औषध प्रशासनाकडून सुरू असलेल्या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यातही संबंधित विभागाने विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
फलटणमध्ये अनेक लहान-मोठ्या दूध डेअरी, बेकरी तसेच विविध अन्न उत्पादन करणारे, हॉटेल,फळे गोडाऊन उद्योग कार्यरत आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नियमांचे पालन याची खातरजमा करण्यासाठी नियमित तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, फलटण बाजारपेठेत अन्न व औषध प्रशासनाचे पथक आल्याची चर्चा असली तरी, अधिकृतरीत्या कोणत्याही कारवाईची माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने आवश्यक तपासणी करून नियमभंग आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फलटणमध्ये अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई कधी? नागरिकांकडून तपासणीची मागणी
By Team LBNN
On: June 15, 2026 2:53 PM
Bakery News,Breaking News Marathi,Dairy News,FDA Maharashtra,Food and Drug Administration,Food Inspection,Food Safety,Health Department,Local News Maharashtra,Lokshahi Baat,Maharashtra FDA,Marathi News,phaltan,Phaltan News,Phaltan Today हॅशटॅग्स: #फलटण #Phaltan #FoodSafety #FDA #Maharashtra #MarathiNews #BreakingNews #Satara #लोकशाहीबातमी #FoodInspection,Public Demand,Satara News,अन्न उत्पादन उद्योग,अन्न व औषध प्रशासन,तपासणीची मागणी,दूध डेअरी तपासणी,धडक कारवाई,नागरिकांची मागणी,फलटण,फलटण न्यूज,फूड सेफ्टी,बेकरी तपासणी,महाराष्ट्र न्यूज,लोकशाही बातमी,सातारा बातम्या












