फलटण : ‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना महाराष्ट्र शासनाचे प्रतिष्ठेचे पत्रकार अधिस्वीकृती (Accreditation) कार्ड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदान, सामाजिक प्रश्नांवरील सातत्यपूर्ण मांडणी आणि जनहिताच्या विषयांवरील निर्भीड वृत्तांकनाची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.
यावेळी हरीश पाटणे यांनी पत्रकारितेची सामाजिक जबाबदारी अधोरेखित करत सत्य, निष्पक्षता आणि लोकहित जपत निर्भीडपणे लेखणी चालविण्याचे आवाहन केले. अधिस्वीकृती कार्ड हा केवळ सन्मान नसून पत्रकाराच्या कार्यावरील विश्वासाची आणि शासनस्तरावरील मान्यतेची पावती असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. वाचकांचा विश्वास, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि समाजहिताची जाणीव या बळावर पुढील काळातही वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि लोकाभिमुख पत्रकारिता सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार सुभाष भांबुरे आणि हितचिंतक उपस्थित होते. उपस्थितांनी मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हरीश पाटणे यांच्या हस्ते ‘फलटण नायक’चे संपादक मितेश उर्फ काकासाहेब खराडे यांना महाराष्ट्र शासनाचे पत्रकार अधिस्वीकृती कार्ड प्रदान
By Team LBNN
On: June 17, 2026 10:35 AM









