सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मा. खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांचे विश्वासू सोशल मीडिया प्रमुख किसनजी गुप्ता यांचा वाढदिवस

On: May 17, 2026 9:55 AM
Follow Us:

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर (दादा) तसेच फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री सचिन पाटील यांचे सोशल मीडिया प्रमुख म्हणून कार्यरत असलेले श्री किसनजी गुप्ता यांचा वाढदिवस आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सोशल मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत असताना, त्या माध्यमाचे प्रभावी नियोजन व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी श्री किसनजी गुप्ता अत्यंत कुशलतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. सोशल मीडिया क्षेत्रातील त्यांची कार्यशैली, संयम आणि समर्पण यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

पत्रकार म्हणून काम करत असताना अनेकवेळा त्यांच्याशी संपर्क आला. प्रत्येक वेळी त्यांनी हसतमुखाने स्वागत करत आपुलकीची भावना जपली. शांत, संयमी, प्रेमळ आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे ते सर्वांच्या मनात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरले आहेत.

अशा या कर्तृत्ववान व सहकार्यशील व्यक्तिमत्त्व असलेल्या श्री किसनजी गुप्ता यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा .

– पत्रकार सागर चव्हाण
संपादक, लोकशाही भारत न्यूज नेटवर्क

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!