सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना पक्षाच्यावतीने स्वबळावर लढवा – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

On: January 4, 2026 7:43 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा – आगामी सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेनेच्या वतीने स्वबळावरच लढविण्याचा निर्णायक आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. “जिल्ह्यात शिवसेनेची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे,” असा ठाम संदेश देत त्यांनी स्थानिक नेतृत्वाला सज्ज राहण्याच्या स्पष्ट सूचना केल्या आहेत.
सातारा येथील सैनिक स्कूल मैदानावर ना. एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई व ना. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर  यांनी प्रत्यक्ष भेट घेत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा रणसंग्राम ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला. या बैठकीत संघटन मजबूत करणे, गावोगावी शिवसेना पोहोचवणे आणि विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याचा राजकीय निर्धार करण्यात आला.
या निर्णायक चर्चेस शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, ज्ञानेश्वर पवार, अमोल निंबाळकर, अ‍ॅड. संदीप कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

अभयसिंह जगताप यांचा पुन्हा एकदा सुसंस्कृतपणा भावला; पराभवानंतरही निष्ठावंत कार्यकर्त्यांसाठी आभार मेळावा

राष्ट्रवादीचे चेतन शिंदे फलटण पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या राजे गटासोबत?

सौ.पायल अमोल पवार यांची सांगवी पंचायत समिती गणातून उमेदवारीची पक्षश्रेष्ठींकडे मागणी;महादेव कोळी समाजाला संधी द्या समाजाची आग्रही भूमिका

सह्याद्री भैया कदम यांच्या प्रवेशाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढली – मंत्री मकरंद आबा पाटील

सौ. वैशालीताई कांबळे यांना बरड जिल्हा परिषद गटातून उमेदवारी मिळावी! ;कार्यकर्त्यांची राजे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे मागणी

नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी चेतन शिंदेंकडून समशेरसिंह यांची घोड्यावरून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक!!

error: Content is protected !!