सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांचा १८८ वा प्रगट दिन सोहळा; २० ते २३ ऑक्टोबरदरम्यान रथोत्सवाचे आयोजन

On: October 14, 2026 6:31 PM
Follow Us:

फलटण : श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज यांच्या १८८ व्या प्रगट दिनानिमित्त व रथोत्सव सोहळ्यानिमित्त फलटण येथे मंगळवार, दि. २० ऑक्टोबर ते शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री सद्गुरू हरिबाबा साधू महाराज देवस्थान ट्रस्ट, श्री सद्गुरू हरिबाबा रथोत्सव समिती आणि ॐ दत्त चिले ॐ भजनी मंडळ, फलटण यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रथपूजन होणार असून, त्यानंतर भजन व भारुड सेवा सादर होईल. बुधवारी सकाळी महाभिषेक, श्री हरिचरित्र वाचन, आरती, महिला भजनी मंडळाची सेवा, प्रवचन आणि रात्री ह.भ.प. चंद्रकांत बर्गे महाराज व सहकलाकार यांची भारुड सेवा आयोजित करण्यात आली आहे.

गुरुवार, दि. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी महाभिषेकानंतर पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळांची भजनसेवा होणार आहे. दुपारी वीरशैव भजनी मंडळ, वीरशैव लिंगायत महिला भजनी मंडळ, फलटण आणि श्री दुर्गा माता महिला भजनी मंडळ, कोळकी यांची सेवा होईल. विशाल भुजंगराव भोईटे यांच्या स्मृतीनिमित्त विठ्ठल मंदिराच्या प्रेरणेतून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ह.भ.प. अंकुश महाराज ईवरे (पीएसआय), टाकळवाडा यांचे प्रवचन, तर रात्री ७ ते ११ या वेळेत कोल्हापूर येथील ‘श्री साई समर्थ भजनी मंडळा’ची भजनसेवा होणार आहे. शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी अश्विन शुद्ध द्वादशीला मुख्य प्रगट दिन सोहळा पार पडणार असून, सकाळी ६ वाजता महाभिषेक आणि सकाळी १० वाजता मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते श्रींच्या रथाचे प्रस्थान होणार आहे.

नगर प्रदक्षिणेचा मार्ग श्रींच्या मंदिरापासून सुरू होऊन मलठणमार्गे फलटण शहरातून जाणार आहे. या मार्गामध्ये उघडा मारुती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगर परिषद, उपळेकर काका मंदिर, मेटकरी गल्ली, शिंपी गल्ली, श्रीराम मंदिर, गजानन चौक, मारवाड पेठ, शुक्रवार पेठ, शंकर मार्केट आणि बुरुड गल्ली या ठिकाणांचा समावेश आहे. या मार्गावरील भाविक व नागरिकांनी नगर प्रदक्षिणेत सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता आरती व महाप्रसादाने चार दिवसीय सोहळ्याची सांगता होणार आहे. या धार्मिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री सद्गुरू हरिबाबा महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा  विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राजाळे सर्कल शाळेला संरक्षक भिंत उभारण्याची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!