अल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणी बचतीसाठी नगरपरिषदेचा निर्णय; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन
फलटण : अल-निनोच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फलटण शहरातील पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार, दिनांक १६ ऑक्टोबर २०२६ पासून ही कपात लागू होणार असून, शहरातील सर्व स्विमिंग पूल आणि वाहन वॉशिंग सेंटर पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ५ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार पाणीपुरवठ्यात कपात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, शहरातील सर्व स्विमिंग पूल आणि सर्व प्रकारच्या वाहनांची धुलाई करणारी वॉशिंग सेंटर्स पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याची उपलब्धता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या निर्णयाची सर्व नागरिकांनी नोंद घेऊन फलटण नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी निखिल जाधव आणि पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापती राहुल निंबाळकर यांनी केले आहे.
फलटण शहरात १६ ऑक्टोबरपासून पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात; स्विमिंग पूल आणि वाहन वॉशिंग सेंटर बंद ठेवण्याचे आवाहन
By Team LBNN
On: October 14, 2026 4:32 PM









