फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त आज, सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री माळजाई देवी मंदिरात अभिषेक, आरती व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी ७.३० वाजता श्री माळजाई देवीचा अभिषेक व आरती श्री. नितीन निकम व सौ. नितीन निकम यांच्या शुभहस्ते तसेच गरवालीया कुटुंबीयांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
आज सायंकाळी ७ वाजता श्री माळजाई देवीची महाआरती होणार असून, यासाठी फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील व सौ. गौरीवहिनी सचिन पाटील तसेच फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर व सौ. मनीषावहिनी समशेरसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी लायन्स क्लब परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांचीही उपस्थिती राहणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वात श्री माळजाई देवीचे दर्शन घेता यावे तसेच अभिषेक व महाआरतीचा लाभ घेता यावा, यासाठी फलटण शहरासह परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब फलटण आणि माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह ना. निंबाळकर यांची उपस्थितीत माळजाई देवी मंदिरात आज अभिषेक व महाआरतीचे आयोजन
By Team LBNN
On: October 12, 2026 8:56 AM






