सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

१२ लाख किमतीचे ४० मोबाईल मूळ मालकांना परत,फलटण शहर पोलिसांची यशस्वी कारवाई

On: May 25, 2026 8:31 PM
Follow Us:

२०२४ पासून ४५५ मोबाईल शोधण्यात यश

फलटण : सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये सी.ई.आय.आर. पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत फलटण शहर पोलिसांनी सुमारे १२ लाख रुपये किमतीचे ४० मोबाईल शोधून मूळ मालकांना परत दिले.

मा. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने सी.ई.आय.आर. पोर्टलच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणा तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धुळे व पुणे जिल्ह्यांतून हे मोबाईल हस्तगत केले.

फलटण शहर पोलिस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव व पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांच्या हस्ते संबंधित नागरिकांना मोबाईल परत देण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिस प्रशासनाचे कौतुक केले.

सन २०२४ पासून आजअखेर फलटण शहर पोलिसांनी ४५५ हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवले आहे.

यावेळी महिला पोलिस उपनिरीक्षक अयोध्या घोरपडे तसेच पोलिस अंमलदार स्वप्नील खवडे, राणी फाळके, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, मुकेश घोरपडे व अतुल बडे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

हे ही वाचा  फलटण डॉक्टर प्रकरण|एसआयटी तपास पथकामध्ये एकूण आठ अधिकाऱ्यांच्या नेमणूकीत अध्यक्षपदी तत्कालीन जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्विनी सातपुते

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!