फलटण- आधुनिक युगातही निरगुडी गावातील अनुसूचित जातीतील होलार समाजाला त्यांच्या वस्तीला जाण्यासाठी आजपर्यंत हक्काचा दहा फूटी रस्ता मिळालेला नाही, ही सामाजिक अन्यायाची शोकांतिका असून याचा परिणाम थेट त्या समाजाच्या जगण्यावरच होत आहे.
वस्तीपर्यंत कोणतेही चारचाकी वाहन जाण्यासाठी मार्ग नसल्यामुळे आजही रहिवाशांना दिवसेंदिवस संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य शाळेच्या आवारात उतरवावे लागते आणि तेथून सुमारे ३०० फूट अंतर पायी नेण्याची वेळ येते. अति तात्काळीच्या वेळेस रुग्णवाहिका किंवा अग्निशामिका देखील पोहोचू शकत नाही.
मार्च २०२५ मध्ये सातारा जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी फलटण, तहसीलदार फलटण तसेच निरगुडी ग्रामपंचायत यांना या प्रश्नासंदर्भात होलार समाजाने निवेदन दिले होते. त्यावेळी फलटणचे तहसीलदार साहेब यांनी “लवकरच बैठक घेऊन निर्णय करतो” असे आश्वासन दिले होते. सप्टेंबरमध्ये फोनवर झालेल्या संभाषणातही त्याच आश्वासनाची पुनरावृत्ती झाली.
मात्र, दुर्दैवाने आज डिसेंबर महिना सुरू झाला तरी ना बैठक घेतली, ना कोणती ठोस भूमिका समोर आली.होलार समाजातील नागरिकांनी प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितले की,
“प्रशासनाने तात्काळ हक्काचा दहा फूटी रस्ता मंजूर करावा; अन्यथा काही दिवसांत आमचा लढा अधिक तीव्र केला जाईल.”
सामाजिक न्याय आणि समान विकासाच्या दृष्टीने हा मूलभूत हक्काचा प्रश्न असून संबंधित प्रशासनिक अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
निरगुडीतील अनुसूचित जातीतील होलार समाज आजही रस्त्यापासून वंचित; प्रशासनाच्या उदासीनतेचा उद्रेक
By Team LBNN
On: December 6, 2025 11:03 AM
---Advertisement---









