सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सोमवार पेठेतील एक संघर्ष : युवा कार्यकर्ता मंगेश आवळे

On: November 16, 2025 9:24 AM
Follow Us:

फलटण – फलटण शहरातील संवेदनशील म्हणून ओळखली जाणारी सोमवार पेठ… आणि त्याच परिसरात 2017 पासून सुरू झालेला एक संघर्ष. हा संघर्ष होता सामाजिक कार्यकर्ते मंगेश आवळे यांच्या सातत्यपूर्ण समाजकारणाचा. अवघ्या 21 व्या वर्षी बहुजन समाज पार्टीच्या फलटण शहर प्रभारीपदापासून सुरू झालेल्या त्यांच्या प्रवासाने जात-पात न पाहता सामान्य कुटुंबांच्या लढ्याला दिशा दिली.

गट क्रमांक 53/54 मधील नागरिकांच्या घरांच्या प्रश्नावर त्यांनी उभारलेला संघर्ष हा सोमवार पेठच नाहीतर तालुक्यात  विशिष्ट चर्चेचा विषय ठरला. या लढ्यात त्यांना खोटे आरोप, पोलीस तक्रारी, गुन्हे अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागले; पण आव्हानांना न घाबरता त्यांनी मागे वळून न पाहता समाजकार्य सुरूच ठेवले.

दलित पॅंथर, आझाद समाज पार्टी, डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनांमधून कार्य करत त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ.श्रीमंत रामराजे ना. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्यात सातत्य ठेवले. सुखापेक्षा दुःखात धावून जाणारा मंगेश आवळे हा गुण त्यांना वेगळं स्थान देतो. परिसरातील अस्वच्छता आणि इतर नागरी समस्या यावर त्यांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे पाठपुरावा करून अनेक कामे करून घेतली.

हे ही वाचा  भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन



डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया चे युवा जिल्हाध्यक्ष म्हणून, राज्यातील विविध अन्याय-अत्याचार प्रकरणांवर त्यांनी शासन दरबारी आंदोलनांच्या माध्यमातून आवाज बुलंद केला. तसेच राजे गटाच्या माध्यमातून समाजकारण व राजकारणात ते सक्रिय आहेत.

याच कार्याच्या जोरावर 2025 फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 1 (अनुसूचित जाती महिला आरक्षित) मधून मंगेश आवळे यांच्या आई सौ. लक्ष्मी प्रमोद आवळे यांना राजे गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. प्रभागातील नागरिकांकडून सौ लक्ष्मी आवळे यांच्या उमेदवारीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

अशा या सतत संघर्ष करत पुढे जाणाऱ्या युवा कार्यकर्ते मंगेश आवळे यांचा आज 16 नोव्हेंबर 2025 रोजी वाढदिवस यानिमित्त असंख्य नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

प्रा. करिष्मा मुलाणी – प्रा. श्रेयस कांबळे यांचा सत्यशोधक पद्धतीने अंतरधर्मीय विवाह

रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोग अध्यक्षपदासाठी अॅड. रूपाली ठोंबरे पाटील आघाडीवर

क्रांतीसुर्य महात्मा फुले व सावित्रीमाईंच्या कार्यावर आधारित एप्रिलला फलटणमध्ये निबंध स्पर्धा; ३१ मार्चपर्यंत नोंदणी आवश्यक

जेष्ठ नागरिक संघ, फलटण यांच्या वतीने आदर्श माता, आदर्श पिता आणि तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण

भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना फलटण येथे अभिवादन

“सत्याचा आसुड” शेतकऱ्यांच्या वेदनेचे व  संघर्षाचे बीज
: डॉ. वसंत काटे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अमेरिका

error: Content is protected !!