सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाळेत संविधान व पत्रकार दिन साजरा

On: January 24, 2026 12:09 PM
Follow Us:
---Advertisement---

फलटण – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर पालिका, मंगळवार पेठ  फलटण येथील प्रशालेत भारतीय संविधान दिन व पत्रकार दिन साजरा करण्यात आला. भारतीय पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण झाली

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भारतीय पत्रकार संघाचे उपजिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. “वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात आणि व्यक्तिमत्त्व घडते. विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावून वाचन संस्कृती जपली पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी पत्रकार प्रमोद सस्ते यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, “भारतीय संविधान हा या देशाचा आत्मा असून लोकशाहीचा कणा आहे. संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपले अधिकार व कर्तव्य समजतात. विद्यार्थ्यांनी लहान वयातच संविधानाची ओळख करून घेणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर भारतीय पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना वही व पेनचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

या कार्यक्रमास भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संदीपकुमार जाधव,तालुकाध्यक्ष राजकुमार काकडे जिल्हाउपाध्यक्ष विकास शिंदे, हल्लाखोर समिती अध्यक्ष आप्पासाहेब तांबे, , तालुका सचिव  अमोल पवार,सहसचिव गणेश भोईटे, शकिल सय्यद, संघटक प्रशांत सोनवणे, प्रगती चळवळचे संपादक प्रमोद सस्ते, जुबेर कोतवाल तसेच लोकशाही भारतचे संपादक सागर चव्हाण प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी मुकाडे ,हिरामण मोरे ,बंडू यादव ,शिवाजी जाधव ,चैत्राली कांबळे,सारिका काकडे, अंबिका काकडे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

हे ही वाचा  पदवीधर मतदार नोंदणीची मुदत वाढली, दहा डिसेंबर पूर्वी ऑनलाइन किंवा ऑफलाइन नोंदणी करावी - तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!