सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटण शहरात १०० कोटींच्या विकासकामांना गती
हद्दवाढीसह ‘अ’ वर्ग नगरपरिषदेचे लक्ष्य

On: March 6, 2026 4:31 PM
Follow Us:

फलटण: फलटण नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
बैठकीस ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव तसेच नगरसेविका मंगलादेवी नाईक निंबाळकर, सुपर्णा सनी अहिवळे, रूपाली अमोल सस्ते, मिना काकडे, मोहिनी हेंद्रे, कुमारी सिद्धाली अनुप शहा आदी उपस्थित होते.
तसेच स्वराज सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल सस्ते, सनी (भैय्या) मांढरे व श्रीवल्लभ हेंद्रे यांनीही उपस्थिती दर्शवली.
मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नगरपरिषदेच्या सुरू असलेल्या व प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा सादर केला.
१०० कोटींच्या विकासकामांना गती
यावेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, फलटण शहराच्या विकासासाठी दिलेले सर्व शब्द पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून सुमारे १०० कोटी रुपयांची विकासकामे पूर्णत्वास नेण्यात येणार आहेत.
यामध्ये नगरपरिषदेकडील २० कोटी रुपये आणि विविध योजनांतील ८० कोटी रुपयांचा निधी समाविष्ट आहे. उद्यान, रस्ते, नाट्यगृह, तारांगण, हॉस्पिटल यांसारखी अनेक विकासकामे मंजूर झाली असून ती लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच आमदार सचिन पाटील यांनी रस्त्यांसाठी १६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचेही सांगितले.
हद्दवाढीसह ‘अ’ वर्ग नगरपरिषद
फलटण नगरपरिषदेच्या हद्दवाढीसाठी फरांदवाडी, ठाकुरकी, जाधववाडी आणि चौधरवाडी या गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव असून भविष्यात फलटण नगरपरिषद ‘अ’ वर्ग नगरपरिषद बनवण्याचा संकल्प असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर विकासासाठी महत्त्वाचे प्रस्ताव
बैठकीत शहर विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय व प्रस्ताव मांडण्यात आले. त्यामध्ये –
शहरातील प्रमुख चौकांत १० सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे
पालखी महामार्गावरील चौकांचे सुशोभीकरण
पाणीपुरवठा पाईपलाईनसाठी ८ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी
दलित वस्तीसाठी ८ ते ९ कोटींची विकासकामे
दगडी पुलाजवळील नाल्यासाठी साडेतीन कोटी रुपयांचा निधी
फरांदवाडी परिसरात १७ एकरांवर भव्य क्रीडांगण
विमानतळ परिसरात हेलिपॅड, हॅंगिंग गार्डन व ॲमिनिटी पार्क
शहरात उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे व कंट्रोल रूम
नगरपालिका इमारतींवर सोलार प्रकल्प
शहरात विविध ठिकाणी पार्किंग सुविधा
तसेच सुपर मार्केटची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी पार्किंग व आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला.
निकृष्ट कामांवर कठोर कारवाई
कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या किंवा निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. अशा ठेकेदारांची ठेव रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा देण्यात आला.
फलटण जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने
फलटण भविष्यात जिल्ह्याचे मुख्यालय होऊ शकते, या दृष्टीने शहराची पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

हे ही वाचा  फलटण नगरपालिका निवडणुक राजे गटाकडून लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चैतन्याचे वातावरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!