फलटण : क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘लोकशाही भारत न्यूज नेटवर्क’ तर्फे “समता क्रांती” हा विशेषांक दि. १४ एप्रिल २०२६ रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
या विशेषांकासाठी सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक तसेच वास्तववादी लेख, प्रेरणादायी कविता,विचारप्रवर्तक विषयांवर लेखन करणाऱ्या लेखक, कवी आणि साहित्यप्रेमींनी आपले स्वलिखित लेख, कविता व इतर साहित्य दि. १० एप्रिल २०२६ पर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनाचा विचार व्यापक करण्याच्या उद्देशाने हा विशेषांक प्रकाशित केला जात असून, अधिकाधिक लेखकांनी यात सहभाग नोंदवावा.
इच्छुकांनी आपले साहित्य खालील व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे: 9370729808 / 9370709351












