सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

ठाकूरकी जिल्हा परिषद शाळेत खाजगी साहित्याचा साठा; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

On: June 25, 2026 8:33 AM
Follow Us:

शाळेच्या आवारात ड्रम, पाईप व लाकडी साहित्य; ग्रामस्थांकडून चौकशी व कारवाईची मागणी

फलटण – ठाकूरकी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात तसेच शाळेच्या इमारतीत पाण्याचे ड्रम, पाईप, लाकडी साहित्य आणि इतर खाजगी वस्तू ठेवण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पालक आणि ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

शाळेच्या आवारात अशा प्रकारचे साहित्य साठविल्याने विद्यार्थ्यांना अपघात किंवा दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शालेय परिसर सुरक्षित ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, शासकीय शाळेच्या जागेत हे साहित्य कोणाच्या परवानगीने ठेवण्यात आले, याबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि नियमांचे उल्लंघन झाले असल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा  लाडका भाऊ योजना प्रशिक्षणार्थ्यांची उदयनराजेंकडे धाव; हक्काच्या रोजगाराची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!