सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सातारा जिल्हा जागतिक पर्यटन हबकडे; कोयना-दौलत डोंगरी महोत्सवासारख्या उपक्रमांची गरज – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

On: April 6, 2026 7:53 PM
Follow Us:
---Advertisement---

सातारा – सातारा जिल्ह्याला जागतिक पर्यटन नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी कोयना-दौलत डोंगरी महोत्सवासारखे उपक्रम ही काळाची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी सांगितले. कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा सांगता समारंभ त्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सांगवड येथील कोयना नदीवरील पूल, दौलतनगर येथील शिवदौलत स्टेडियम, लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकातील संगीत कारंजे व लेझर शो तसेच शिवाजीराव देसाई स्मृतिभवनाचे उद्घाटन करण्यात आले. पापर्डे येथील जल पर्यटन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्प, कोयना बॅकवॉटर फेस्टिवल, रोपवे आणि पूल उभारणीमुळे पर्यटनाला चालना मिळणार असून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. डोंगरी महोत्सवातून सांस्कृतिक कार्यक्रमांसह साहसी पर्यटनालाही प्रोत्साहन दिले जात आहे. शेतकरी व युवकांसाठी क्लस्टर शेती, बांबू लागवड अनुदान, तसेच ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राबवून विकासाला गती देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच साताऱ्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

हे ही वाचा  संजय हंसराज लोंढे यांचे निधन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!