
मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज पार्श्वगायिका यांचे आज वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली असून, एक सुवर्णयुग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
आशा भोसले यांना गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास होत होता. त्यांना मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात कुटुंबीयांसह असंख्य चाहते आणि संगीतप्रेमी असा मोठा परिवार आहे.
८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले या यांच्या धाकट्या बहिण होत्या. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या संगीत परंपरेत वाढलेल्या आशाताईंनी अत्यंत लहान वयात गायनास सुरुवात केली.
आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, तमिळ, तेलुगू अशा २० हून अधिक भाषांमध्ये १२ हजारांहून अधिक गाणी गायली. शास्त्रीय, गझल, कॅबरे, पॉप अशा विविध शैलींमध्ये त्यांनी आपली अष्टपैलूता सिद्ध केली. त्यामुळे त्यांना ‘व्हर्साटाइल सिंगर’ म्हणून ओळख मिळाली.
त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारकडून त्यांना पद्मविभूषण (२००८) आणि दादासाहेब फाळके पुरस्कार (२०००) यांसह अनेक मानाचे पुरस्कार देण्यात आले होते.
आशा भोसले यांच्या निधनाची बातमी समोर येताच राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला असून, त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.










