कोरेगाव : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, परिवर्तन विचार मंच व किंग मेकर ग्रुप कोरेगाव यांच्या वतीने महान समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कोरेगाव व सातारा शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात मध्यरात्री १२ वाजता कोरेगाव येथील जुना मोटार स्टँड परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व आतषबाजीने करण्यात आली. दुपारी १२ वाजता डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांनी महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपअधीक्षक राजेश्री तेरणी, पोलिस निरीक्षक बल्लार, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत भंडारे, जि. नियोजन समिती अध्यक्ष राहुल बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल बर्गे, नगरसेवक प्रीतम बर्गे, प्रदीप बोतालजी, जालिंदर बोतालजी, सुनील बर्गे, संतोष बर्गे, साई बर्गे, संभाजी ब्रिगेडचे पांडुरंग पवार, वकील डेरे, वैभव रणखांबे, समाधान शेडगे, राजू शिंदे, वैभव जगदाळे, अमोल भूतकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कोरेगाव शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच माऊली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोरेगाव यांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी व कुमारवयीन मुलींसाठी आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. तपासणीदरम्यान गरजू रुग्णांना आवश्यक असल्यास हर्निया, अपेंडिक्स, अंडाशय व मूत्रमार्ग संबंधित शस्त्रक्रिया मोफत करण्याची घोषणा करण्यात आली.
याशिवाय महागाव (सातारा) येथील वृद्धाश्रमात अन्नदानाचा कार्यक्रमही पार पडला. कार्यक्रमासाठी पत्रकार, शिक्षक, प्राध्यापक, अधिकारी, पोलीस कर्मचारी व विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. आदिश पाटील व डॉ. टीकुळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, मनीषा सोनवणे, युवक अध्यक्ष ऋतुराज वायदंडे, उपाध्यक्ष लक्ष्मण माने, आकाश येवले, निखिल गायकवाड, समीर शिखरे, रोहित बुधवले, सुनील बोतालजी, निलेश बोतालजी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी महिला आघाडी तालुका अध्यक्ष मनीषा सोनवणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत भंडारे यांनी कार्यक्रम यशस्वी झाल्याची घोषणा केली.
कोरेगावात महापुरुषांना अभिवादनासोबत समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल
By Team LBNN
On: April 14, 2026 9:53 PM
---Advertisement---











