सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

ररणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने महिला आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

On: April 26, 2026 9:54 AM
Follow Us:

फलटण : ररणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या वतीने श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, कृषि महाविद्यालय तसेच श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल, फलटण येथे महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थिनी व शिक्षिका स्टाफचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर (हॉर्टिकल्चर), प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण (अ‍ॅग्रीकल्चर), रेक्टर सौ. सीमा शेडगे, तसेच श्रीमंत मालोजीराजे विद्यार्थी वसतिगृहाचे अधीक्षक श्री. जीवन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिक्षकवर्ग आणि बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
शिबिरात श्री. अभिजीत भालके व डॉ. सौ. श्रुती विक्रांत थिटे यांनी विद्यार्थिनी व शिक्षिका स्टाफ यांना महिला आरोग्य आणि विविध आरोग्य समस्यांबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला.
या उपक्रमासाठी संस्थेच्या वतीने अध्यक्ष सौ. रझिया शेख, सचिव मारुती टकले, खजिनदार श्री. कैफ शेख, श्री. शरद पवार, श्री. राज चांदवडकर, संचालिका मा. मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ. माया बनसोडे, सौ. प्रीती शाह आणि सौ. अनिसा सय्यद उपस्थित होते. कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

हे ही वाचा  शहीद भगतसिंग प्रतिष्ठानचा उपक्रम; विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

error: Content is protected !!