सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

खाजगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे? सरकारी रुग्णालयात जाहिरात झळकली

On: May 8, 2026 3:59 PM
Follow Us:

फलटण : फलटण येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयामध्ये चक्क एका खाजगी हॉस्पिटलची जाहिरात लावण्यात आल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील केस पेपर विभागासमोर तसेच मुख्य प्रवेशद्वारातच खाजगी डॉक्टरांचा स्टँडी लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य  व्यक्त होत आहे.

सरकारी रुग्णालयामध्ये खाजगी डॉक्टरांची चिठ्ठी देणे, बाहेरील औषधे सुचवणे अथवा रुग्णांना खाजगी रुग्णालयांकडे वळवणे यावर नियमांनुसार बंदी असताना, थेट रुग्णालयात खाजगी हॉस्पिटलची जाहिरात झळकणे गंभीर मानले जात आहे. त्यामुळे संबंधित खाजगी डॉक्टरांसोबत कोणाचे लागेबांधे आहेत? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

विशेष म्हणजे, रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण उपचारासाठी येत असतात. अशा ठिकाणी खाजगी हॉस्पिटलची जाहिरात लावल्याने सामान्य रुग्णांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

ही जाहिरात कोणाच्या परवानगीने लावण्यात आली? प्रशासनाला याची माहिती होती का? तसेच यामागे कोणते आर्थिक हितसंबंध आहेत का? याबाबत सातारा जिल्हा आरोग्य विभागाने तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

हे ही वाचा  सातारा रोड जागा प्रकरण ; आमच्या जागेबाबत न्याय न मिळाल्यास हजारोंचा मोर्चा काढणार - रामभाऊ मदने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!