सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष श्री समशेरसिंह ना. निंबाळकर यांच्या हस्ते दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत महिला बचत गटांना लाखोंची मदत; प्रधानमंत्री आवास योजनेतील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप

On: May 8, 2026 5:46 PM
Follow Us:

फलटण : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा १” अंतर्गत नगरपरिषद सभागृह, बी.एस.एन.एल. कार्यालय शेजारी, फलटण येथे विशेष शिबिर पार पडले. शिबिरामध्ये विविध महसूल व शासकीय सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या.

याच कार्यक्रमात प्रधानमंत्री आवास योजना 2.0 अंतर्गत फलटण शहरातील ३५ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य धनादेशांचे वाटप करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना 2.0 नुसार फलटण शहर हद्दीत १२०० घरकुलांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

तसेच “दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी आजीविका अभियान” अंतर्गत शहरातील तीन महिला बचत गटांना अर्थसहाय्याचे वाटप करण्यात आले. आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते दोन महिला बचत गटांना प्रत्येकी ३ लाख रुपये तर एका बचत गटाला ICICI Bank मार्फत १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले. संबंधित धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

शिबिरामध्ये वारस नोंद, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, जमीन व्यवहार, फेरफार प्रकरणे, ई-मोजणी, पीएम किसान, आधार सीडिंग, Farmer ID तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज, गाव नमुना दुरुस्ती आणि एक खिडकी योजना यांसारख्या सुविधांचाही लाभ नागरिकांनी घेतला.

यावेळी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, कृषी अधिकारी गायकवाड, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेवक रोहित नागटिळे, नगरसेवक संदीप चोरमले, सरपंच सागर अभंग, भूमी अभिलेख अधिकारी पिसे, माजी नगरसेवक अनुप शहा तसेच फलटण शहर व तालुका प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, महिला बचत गट सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  लाडका भाऊ योजना प्रशिक्षणार्थ्यांची उदयनराजेंकडे धाव; हक्काच्या रोजगाराची मागणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!