फलटण : फलटण नगरपरिषद हद्दीतील सोमवार पेठ या संपूर्ण भागाला ज्या पाणीपुरवठा टाकीतून पाणीपुरवठा केला जातो, त्या फिरंगाई देवी मंदिर येथील पाणीपुरवठा टाकीचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही हुल्लडबाज तरुणांनी व्हॉल्व्हवर दगड टाकल्याने तो खराब झाल्याचे सांगितले जात आहे. व्हॉल्व्ह खराब झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत असून, लाखो लिटर पाणी वाया जाण्याची शक्यता आहे.
पाणीपुरवठ्याच्या महत्त्वाच्या यंत्रणेचे नुकसान झाल्याने फलटण नगरपरिषदेला आता हा व्हॉल्व्ह तातडीने दुरुस्त करावा लागणार आहे. दुरुस्तीला विलंब झाल्यास दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याची शक्यता आहे.
सार्वजनिक पाणीपुरवठा यंत्रणेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि व्हॉल्व्हची तातडीने दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
सोमवार पेठेच्या पाणीपुरवठा टाकीचा व्हॉल्व्ह खराब; लाखो लिटर पाणी वाया
By Team LBNN
On: August 20, 2026 6:33 AM










