सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सोने खरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा; ‘स्वदेशी’ आणि बचतीवर भर

On: May 11, 2026 9:30 AM
Follow Us:

जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थिती गंभीर बनत असताना पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक पुरवठा साखळीवरील ताण लक्षात घेऊन नागरिकांनी पुढील एक वर्ष अनावश्यक सोने खरेदी टाळावी, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करावा तसेच परकीय चलन बचतीसाठी सहकार्य करावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थिती गंभीर बनत असताना पंतप्रधान Narendra Modi यांनी देशवासियांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष, वाढत्या कच्च्या तेलाच्या किंमती आणि जागतिक पुरवठा साखळीवरील ताण लक्षात घेऊन नागरिकांनी पुढील एक वर्ष अनावश्यक सोने खरेदी टाळावी, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचा वापर संयमाने करावा तसेच परकीय चलन बचतीसाठी सहकार्य करावे, असे मोदी यांनी म्हटले आहे.

हैदराबाद येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले की, “देश प्रथम” हा संकल्प घेऊन प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची गरज आहे. वाढत्या जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असून त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि परकीय चलन साठ्यावर होत आहे.

पंतप्रधानांनी नागरिकांना मेट्रो, सार्वजनिक वाहतूक आणि कारपूलिंगचा वापर वाढवण्याचे आवाहन केले. शक्य असेल तिथे Work From Home, ऑनलाइन मिटिंग आणि व्हर्च्युअल कॉन्फरन्स यांचा वापर पुन्हा सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. मालवाहतुकीसाठी रेल्वेचा वापर वाढवण्यावरही त्यांनी भर दिला.

हे ही वाचा  खाद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; फलटणमध्ये "Yumma! फूड डिलिव्हरी अ‍ॅप"ची दमदार एंट्री

मोदी यांनी स्पष्ट केले की भारत मोठ्या प्रमाणावर सोने आणि इंधन आयात करतो. त्यामुळे अनावश्यक सोने खरेदी, परदेश प्रवास आणि विदेशी वस्तूंवरील खर्च कमी झाल्यास देशाचा परकीय चलन साठा सुरक्षित राहण्यास मदत होईल. नागरिकांनी “Vocal for Local” आणि “मेड इन इंडिया ” उत्पादनांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी सांगितले.

यासोबतच खाद्यतेलाचा वापर १० टक्क्यांनी कमी करण्याचे आवाहन करत त्यांनी हे आरोग्य आणि अर्थव्यवस्था दोन्हीसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे तसेच डिझेल पंपाऐवजी सौरऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचा वापर वाढवावा, असेही मोदी यांनी म्हटले.

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधानांच्या आवाहनाला समर्थन देत नागरिकांनी इंधनाचा संयमाने वापर करावा, असे म्हटले आहे. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये इंधन तुटवडा आणि दरवाढीची समस्या निर्माण होत असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक तणाव कायम राहिल्यास भारतात इंधन दरवाढ, महागाई आणि आयात खर्च वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकार नागरिकांच्या सहभागातून आर्थिक दबाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!