सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

महात्मा फुले गौरव पुरस्काराने अजित जाधव सन्मानित

On: May 15, 2026 2:29 PM
Follow Us:

फलटण : महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त समाजामध्ये विशेष उल्लेखनीय व आदर्श कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानार्थ सावित्रीबाई सेवा फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने समाज गौरव व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा फुले विचार अभियानाचे संयोजक अजित जाधव यांना समाज व देशहिताच्या उल्लेखनीय कार्याबद्दल “महात्मा फुले गौरव पुरस्कार” प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना मांडवी कोळीवाडा, मुंबई येथे “महात्मा” पदवी अर्पण समारंभाच्या १३८ व्या संस्मरणीय दिनानिमित्त पुण्यातील नाना पेठ परिसरातील ऐतिहासिक क्रांतीभूमी अहिल्याश्रम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

डीसीएम सोसायटीचे जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे यांच्या हस्ते अजित जाधव यांना स्मृतिचिन्ह, शाल, भारतीय संविधानाची प्रत तसेच महात्मा फुले यांची पुस्तिका देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वयंसिद्ध राखी रासकर, प्राचार्य डॉ. वृषाली रणधीर (नेस वाडिया कॉलेज), प्राचार्य डॉ. पौर्णिमा कदम, प्रा. किशोर चौरे, धर्मप्रकाश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

अजित जाधव यांनी सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केले असून सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक, विधायक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे. “महात्मा फुले विचार अभियान” या उपक्रमांतर्गत त्यांनी फुले दांपत्यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार करण्याचे कार्य केले. तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याशी संबंधित ऐतिहासिक स्थळांवर “क्रांतिकार्य उजाळा” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. फुले प्रेमींना महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे वितरण तसेच त्यांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव सोहळाही आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमास सावित्रीबाई सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ललित प्रसून, सचिव हेमा मस्के, लेखिका रश्मी दीक्षित, सामाजिक कार्यकर्ते महादेव शिंदे, वृषभ मस्के आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्त्या भारती अंकेलू यांनी केले तर कार्यक्रम संयोजक प्रशांत फुले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हे ही वाचा  कॅनॉलमध्ये बुडणाऱ्या दाम्पत्याला जीवदान; गोविंद बोडरे यांचा फलटण आरटीओकडून सन्मान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!