सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

फलटणमध्ये ८ मे रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर

On: May 6, 2026 1:30 PM
Follow Us:

फलटण – फलटण शहरात महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागामार्फत “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान टप्पा १” अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. ८ मे २०२६ रोजी नगरपरिषद सभागृह, बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारी, फलटण येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसूल व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये वारस नोंद, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर, जमीन व्यवहार, फेरफार प्रकरणे, ई-मोजणी, पीएम किसान, आधार सीडिंग, Farmer ID तसेच विविध शासकीय योजनांचे मार्गदर्शन आदी सेवांचा समावेश आहे.
तसेच विद्यार्थ्यांसाठी दाखले वितरण, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे अर्ज, गाव नमुना दुरुस्ती, एक खिडकी योजना यांसारख्या सुविधाही उपलब्ध राहणार आहेत.
प्रशासनाने शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, महिला बचत गट, युवक मंडळे व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी केले आहे.

हे ही वाचा  महात्मा फुले गौरव पुरस्काराने अजित जाधव सन्मानित

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!