सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जब्रेश्वर मंदिर परिसरात फोटोशूट व प्री-वेडिंग व्हिडिओला मनाई?; तरुणाई मध्ये नाराजीचा सूर, नेमका आदेश कोणाचा?

On: May 11, 2026 11:16 PM
Follow Us:

फलटण : फलटण शहरातील ऐतिहासिक आणि पुरातन वारसा लाभलेल्या प्रसिद्ध जब्रेश्वर मंदिर परिसरात फोटो व व्हिडिओ शूटिंगसाठी मनाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकावर “प्री-वेडिंग फोटो व व्हिडिओ शूट करण्यास सक्त मनाई असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल” असा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच हा आदेश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India) यांच्या नावाने असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

यामुळे अनेक तरुण-तरुणींमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. फलटण तालुक्यातील अनेक जण ऐतिहासिक वास्तू आणि निसर्गरम्य पार्श्वभूमीमुळे जब्रेश्वर मंदिर परिसराची प्री-वेडिंग शूट व प्रोफेशनल फोटोशूटसाठी निवड करत असतात. अचानक लावण्यात आलेल्या या फलकामुळे सोशल मीडियावरही चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मंदिराचे ऐतिहासिक आणि धार्मिक पावित्र्य जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे का? तसेच संबंधित फलक खरोखरच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडून अधिकृतरीत्या लावण्यात आला आहे की अन्य कोणाकडून, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

यासंदर्भात संबंधित प्रशासन किंवा पुरातत्त्व विभागाकडून अधिकृत स्पष्टीकरण मिळाल्यास नेमकी परिस्थिती स्पष्ट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!