सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

साताऱ्यात 14 ते 15 मे रोजी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा; प्रशासनाच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

On: May 13, 2026 9:46 AM
Follow Us:

सातारा – सातारा येथे 14 ते 15 मे दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला. या स्पर्धांसाठी प्रशासनाचे पूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह स्पर्धा आयोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी आरोग्य, सुरक्षा, वाहतूक, पार्किंग, निवास व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि विद्युत पुरवठा याबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

आरोग्य विभागाने स्पर्धा स्थळी आवश्यक औषधसाठा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था ठेवावी, असे निर्देश देण्यात आले. तसेच आयोजकांनी खासगी रुग्णालयांशी समन्वय साधून आपत्कालीन उपचारांसाठी आयसीयू बेड राखीव ठेवावेत, असेही सांगण्यात आले.

स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेता सुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले. कुस्ती आखाडे आणि प्रेक्षक यांच्यामध्ये बॅरिकेट्स उभारणे, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करणे तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस विभागाशी समन्वय साधून नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय, स्पर्धेला येणाऱ्या अतीमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिपॅडची पर्यायी व्यवस्था ठेवण्याबाबतही चर्चा झाली. विद्युत व्यवस्था सुरक्षित आणि सुरळीत असल्याची खात्री संबंधित विभागांनी करावी, तसेच पिण्याच्या पाण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

“हिंदकेसरी स्पर्धेमुळे सातारा शहराचे नाव देशपातळीवर झळकणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून स्पर्धा यशस्वी कराव्यात,” असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले.

हे ही वाचा  फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!