सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मातंग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण; २३ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी

On: August 13, 2026 9:42 PM
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत कार्यरत अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (ARTI), मुंबईमार्फत मातंग व तत्सम जातीतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या योजनेचा अधिकाधिक पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ARTIचे व्यवस्थापकीय संचालक सुनील वारे यांनी केले आहे.

या प्रशिक्षणामध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC), महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (MES), न्यायिक सेवा (JMFC), कर्मचारी निवड आयोग (SSC), IBPS, रेल्वे, LIC तसेच पोलीस व सैन्य भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांना दिल्ली व महाराष्ट्रातील नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत नि:शुल्क पूर्व प्रशिक्षण दिले जाणार आहे.

प्रशिक्षण काळात विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत यासाठी दरमहा १० हजार ते १३ हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच पुस्तके व इतर अनुषंगिक खर्चासाठी १३ हजार ते १८ हजार रुपयांपर्यंत एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

अनुसूचित जातीतील मांग, मातंग, मिनिमादिग, ढबनी-मांग, मांग-रक्षी, मदारी, गारुडी, राधामांग, मांग-गारुडी, मांग-गारुडी, मायतीत व मातिया या समाजातील पदवीधर उमेदवार या योजनेसाठी पात्र असल्याचे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर सामाजिक प्रवेश परीक्षा (CET) गुणांच्या आधारे प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे.

पात्र उमेदवारांनी http://articet2026.cbtexam.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज प्रक्रिया ९ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ ऑगस्ट २०२६ आहे.

मातंग व तत्सम समाजातील अधिकाधिक पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेशाचे ध्येय साध्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हे ही वाचा  पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने सेवेतून बडतर्फ, पोलिस महानिरीक्षकांचे आदेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!