सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

स्वच्छता आणि व्यवस्थापनात बारामती बसस्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक; 1 कोटींच्या पुरस्काराने होणार गौरव!

On: May 29, 2026 9:34 PM
Follow Us:

बारामती : ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान 2025’ अंतर्गत ‘अ’ वर्ग बसस्थानकांच्या स्पर्धेत बारामती बसस्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे बारामतीने संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली असून, हा प्रत्येक बारामतीकरासाठी अभिमानाचा क्षण असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल बारामती बसस्थानकाला 1 कोटी रुपयांचे बक्षीस आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. 1 जून 2026 रोजी मुंबई येथे परिवहन मंत्र्यांच्या हस्ते गौरव सोहळा पार पडणार आहे.

सुनेत्रा पवार यांनी बारामती आगारातील चालक, वाहक, यांत्रिक, प्रशासकीय तसेच पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, स्वच्छता, शिस्त, नियोजन आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचा आदर्श बारामती बसस्थानकाने राज्यासमोर ठेवला आहे.

त्यांनी पुढे म्हटले की, बारामती अधिक सुंदर आणि आदर्श व्हावी, यासाठी अजितदादांनी पाहिलेले स्वप्न आज प्रत्यक्षात उतरले आहे. बारामती बसस्थानक हे त्यांच्या विकासदृष्टीचे जिवंत प्रतीक असून, हा सन्मान केवळ बसस्थानकाचा नसून त्यांच्या कार्याला मिळालेली खरी पोचपावती आहे.

हे ही वाचा  यशोदा नगरमध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव ; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!