सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

On: July 14, 2026 5:14 PM
Follow Us:

संभाजीनगर | प्रतिनिधी : समाधान बक्षी
छत्रपती संभाजीनगरजवळील वाळूज परिसरातील बजाजनगर औद्योगिक वसाहत, सिडको, वाळूज महानगर, म्हाडा कॉलनी तसेच आदर्श नगर परिसरातील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून पी.एन.जी.जोडणी मिळालेली नसल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

याशिवाय, या परिसरातील रस्ते खोदून ठेवण्यात आले असून संबंधित विभागाकडून कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आला. नागरिकांना यामुळे मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून, गॅस जोडणीचे काम व रस्त्यांची दुरुस्ती तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

अन्यथा संबंधित विभागाविरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वाळूज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख विष्णू जाधव, पश्चिम विधानसभा प्रमुख प्रमोद ढेगडे, शहर प्रमुख विशाल खंडागळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील, विभाग प्रमुख विनोद दाभाडे, उपविभाग प्रमुख कचरू साळे पाटील, रवी पाईकवार आणि संशोधन साळवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हे ही वाचा  दैनिक लोकमतचे फलटण तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

डी. वाय. पाटील यांच्या निधनाने शिक्षण व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी; श्रीमंत संजीवराजे ना. निंबाळकर यांनी घेतली पाटील कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

आमदार सचिन पाटील यांच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध; महेंद्र सूर्यवंशी – बेडके  यांची टीका

फलटण एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त श्रीमंत सगुणामाता प्राथमिक विद्यामंदिरात योग प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

error: Content is protected !!