सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

On: July 15, 2026 7:32 AM
Follow Us:

फलटण प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण कार्याचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ पत्रकार व प्राध्यापक दिवंगत प्रा. रमेश तुकाराम आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शनिवार, दि. १८ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२.०० या वेळेत स्मृतिदिन अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रा. आढाव यांनी आपल्या प्रदीर्घ कार्यकाळात समाजकारण, राजकारण, शिक्षण, साहित्य आणि पत्रकारिता या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देत अभ्यासू लेखन, वैचारिक भूमिका आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला. त्यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात त्यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० ते ११.०० या वेळेत स्मृतिदिन संस्कार विधीने होईल. त्यानंतर ११.०० ते १२.०० या वेळेत विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रा. आढाव यांच्या व्यक्तिमत्त्व, कार्यकर्तृत्व, पत्रकारितेतील योगदान आणि सामाजिक विचारांवर स्मृतिपर मनोगत व्यक्त करतील.

हा अभिवादन कार्यक्रम महाराजा मंगल कार्यालय, लक्ष्मीनगर, फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे. प्रा. रमेश आढाव यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी नागरिक, पत्रकार, साहित्यप्रेमी, सहकारी, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे ही वाचा  “आद्य दीपोत्सव – लोकशाही भारत दिवाळी विशेषांक २०२५”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

ॲट्रॉसिटी कायद्यातील गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

error: Content is protected !!