सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ २० जुलैला फलटणमध्ये धरणे आंदोलन

On: July 17, 2026 10:34 AM
Follow Us:

फलटण : देशातील शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या गैरप्रकारांविरोधात आवाज उठविणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा दर्शविण्यासाठी फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते, युवक आणि नागरिकांनी निवासी नायब तहसीलदार, तहसील कार्यालय, फलटण यांना निवेदन सादर केले. दि. २० जुलै २०२६ रोजी फलटण येथे एकदिवसीय शांततापूर्ण धरणे आंदोलन आयोजित करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित NEET तसेच इतर स्पर्धा परीक्षांमधील कथित पेपरफुटीच्या घटनांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास कायम राहावा यासाठी पारदर्शक, जबाबदार आणि भ्रष्टाचारमुक्त परीक्षा प्रणाली उभारणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
NEET व इतर स्पर्धा परीक्षांतील कथित पेपरफुटी प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
विद्यार्थ्यांचा विश्वास पुनर्स्थापित करण्यासाठी पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त परीक्षा व्यवस्था निर्माण करावी.
या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा.
शिक्षण व्यवस्थेत तातडीने आवश्यक सुधारणा करून शिक्षण क्षेत्र राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करावे व विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला आणि न्यायाला प्राधान्य द्यावे.
प्रस्तावित धरणे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि लोकशाही मार्गाने करण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम व अटींचे काटेकोर पालन करण्यात येईल, अशी ग्वाही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिली.
यावेळी सतीश गाढवे, कालिदास चोरमले, राजेंद्र भिसे, अमोल रासकर, नानासो गोवेकर, अक्षय चोपडे, यश चांगण, वैभव नरुटे, नितीन सुळ यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित या महत्त्वाच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घ्यावी आणि दि. २० जुलै रोजी होणाऱ्या शांततापूर्ण धरणे आंदोलनास प्रशासनाने आवश्यक परवानगी द्यावी, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

हे ही वाचा  मेणबत्तीच्या प्रकाशातून IPS पर्यंतचा प्रवास; इल्मा अफरोज यांची प्रेरणादायी यशोगाथा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!