सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

पंचशील बुद्ध विहारात संविधान गुणगौरव परीक्षार्थींचा उत्साहात गौरव सोहळा

On: May 6, 2026 7:23 PM
Follow Us:

फलटण : पंचशील नगर येथील पंचशील बुद्ध विहारात संविधान जनजागृती उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या संविधान गुणगौरव परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमास उपसरपंच रूपाली कांबळे व मधोजी शाळेचे क्लार्क हरिभाऊ मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी संविधान विषयावर प्रभावी भाषणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले, तर सर्व सहभागी परीक्षार्थींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी विहाराच्या कार्यकारिणीतील प्रदीप गायकवाड, रवी कांबळे, नितीन कांबळे, किशोर कांबळे व सनी आहिवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच शमा शेख, रेखा कांबळे, अश्विनी कांबळे, कोमल लोंढे, रजिया शेख, भामा आढाव, राजेंद्र आढाव यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम सुजाता बनसोडे यांच्या पुढाकाराने व विशेष प्रयत्नांतून यशस्वीरीत्या पार पडल्याचे उपस्थितांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी राजेंद्र आढाव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
संविधानाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

हे ही वाचा  मेणबत्तीच्या प्रकाशातून IPS पर्यंतचा प्रवास; इल्मा अफरोज यांची प्रेरणादायी यशोगाथा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ २० जुलैला फलटणमध्ये धरणे आंदोलन

मेणबत्तीच्या प्रकाशातून IPS पर्यंतचा प्रवास; इल्मा अफरोज यांची प्रेरणादायी यशोगाथा

कारागृह म्हणजे स्वतःला शोधण्याचे ठिकाण आहे – अजिंक्य चांदणे

आई-वडिलांच्या साक्षीने महात साहेबांचा सन्माननीय निरोप; मुख्याधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसवून दिला विशेष आदर सन्मान!!

भारतीय पत्रकार संघाच्या फलटण कार्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पत्नीच्या प्रसुतीसाठी रजेवर आलेल्या जवानाचा अपघातात मृत्यू
स्ट्रेचरवरून ओली बाळंतीण पत्नीनं दिला पतीला अखेरचा निरोप; साताऱ्यावर शोककळा

error: Content is protected !!