सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

जनसंपर्काची ताकद अन् रोखठोक भूमिकेची ओळख; सुधीर अहिवळे यांचा आज वाढदिवस

On: August 14, 2026 9:35 AM
Follow Us:

फलटणच्या सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रात आपल्या वेगळ्या कार्यशैलीने ठसा उमटविणारे नाव म्हणजे साप्ताहिक ‘फलटण दर्शन’चे संपादक सुधीर तानाजी अहिवळे. स्पष्ट विचार, रोखठोक भूमिका आणि समाजहिताची जपणूक करण्याची वृत्ती यामुळे त्यांनी फलटणच्या सार्वजनिक जीवनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

फलटण नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष स्वर्गीय तानाजी बाबुराव अहिवळे यांचे चिरंजीव असलेल्या सुधीर अहिवळे यांच्यावर घरातील सामाजिक आणि राजकीय संस्कारांचा प्रभाव राहिला. वडिलांनी निर्माण केलेला सामाजिक वारसा पुढे नेत त्यांनी जनसामान्यांशी असलेले नाते अधिक घट्ट केले. अडचणीच्या काळात कोणाच्याही मदतीला धावून जाण्याची त्यांची वृत्ती आणि सतत लोकांच्या संपर्कात राहण्याची कार्यपद्धती यामुळे ‘सुधीर चेअरमन’ ही ओळख त्यांना मिळाली.

समाजकारण आणि राजकारणातील वाटचालीला त्यांनी वडील तानाजीराव तसेच मोठे बंधू आशिष अहिवळे यांच्या संस्कारांची आणि मार्गदर्शनाची जोड दिली. कार्यकर्ते, मित्र, सहकारी आणि सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि शक्य तेथे मदतीसाठी पुढे येणे, हा त्यांच्या कामाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे.

फलटणच्या राजे घराण्याशी एकनिष्ठ राहून मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ते राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. मोठा जनसंपर्क आणि विविध क्षेत्रातील मित्रपरिवार ही सुधीर अहिवळे यांची जमेची बाजू मानली जाते.

रोखठोक बोलणे हा त्यांचा स्वभाव; मात्र माणुसकी जपणे ही त्यांची भूमिका आहे. स्पष्टवक्तेपणामुळे ते अनेकदा आपली भूमिका ठामपणे मांडतात, तर दुसरीकडे प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याचा त्यांचा स्वभावही पाहायला मिळतो. त्यामुळेच अन्यायाच्या प्रसंगी मदतीसाठी पुढे येणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

अहिवळे कुटुंबाला फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय कार्याची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. त्यांच्या पत्नी सौ. वैशाली सुधीर अहिवळे यांनी नगरसेविका म्हणून काम करताना आपली वेगळी छाप निर्माण केली. कुटुंबाचा हा सामाजिक वारसा पुढे नेत सुधीर अहिवळे यांनी सार्वजनिक जीवनात आपला ठसा कायम ठेवला आहे.

पत्रकारितेच्या क्षेत्रातही सुधीर अहिवळे यांचा दोन दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. साप्ताहिक ‘फलटण दर्शन’च्या माध्यमातून त्यांनी स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि जनतेच्या विविध समस्या सातत्याने मांडल्या. पत्रकारिता केवळ व्यवसाय न मानता समाजातील प्रश्नांना वाचा फोडण्याचे माध्यम म्हणून त्यांनी तिच्याकडे पाहिले आहे. पत्रकारांच्या अडचणी आणि हक्कांच्या प्रश्नांवरही त्यांनी वेळोवेळी ठाम भूमिका घेतली आहे.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, सहकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सामाजिक, राजकीय आणि पत्रकारिता क्षेत्रातील त्यांची वाटचाल अधिक यशस्वी व्हावी, त्यांना उत्तम आरोग्य, सुख, समाधान, यश आणि दीर्घायुष्य लाभावे, हीच मनःपूर्वक सदिच्छा.

सुधीर चेअरमन यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

हे ही वाचा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

फलटण तालुक्यातील महिला व युवकांसाठी मोफत रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्राइड एलिट मध्ये सोबत मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह ना. निंबाळकर आमदार सचिन पाटील

ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त १८ जुलै रोजी अभिवादन कार्यक्रम

पी.एन.जी. गॅस जोडणी व रखडलेल्या कामांवरून तीव्र आंदोलनाचा इशारा;शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निर्धार

ॲट्रॉसिटी कायद्यातील गुन्ह्यांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

error: Content is protected !!