सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार आरटीओची कारवाई; अटकाव वाहने फलटण पोलीस ठाण्यात, कर न भरल्यास लिलाव

On: August 28, 2026 11:18 AM
Follow Us:

फलटण : फलटण एसटी बस आगार परिसरात मोठ्या प्रमाणावर अटकावून ठेवण्यात आलेली वाहने आता प्रशासकीय व सुरक्षिततेच्या कारणास्तव फलटण एसटी डेपोतून फलटण शहर पोलीस ठाणे आवारातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आली आहेत. संबंधित वाहनमालक, चालक, वित्तीय संस्था तसेच सर्वसामान्य जनतेस याबाबत जाहीर नोटीसद्वारे माहिती देण्यात आली आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय फलटण तसेच आरटीओच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वायुवेग पथकाने मोटार वाहन कायदा १९८८ आणि मुंबई मोटार वाहन कर कायदा १९५८ मधील तरतुदींनुसार ही वाहने जप्त अथवा अटकावून ठेवली होती.

मात्र, ही वाहने एसटी आगार परिसरात मोठ्या प्रमाणावर उभी असल्याने एसटी बस वाहतूक, बस पार्किंग, प्रवासी सुरक्षितता आणि प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे मा. परिवहन मंत्र्यांच्या जून २०२६ मधील फलटण दौऱ्यादरम्यान देण्यात आलेल्या निर्देशांनुसार वाहने पोलीस ठाणे आवारात स्थलांतरित करण्यात आल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

१५ दिवसांची मुदत

संबंधित वाहनधारकांनी नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आपले म्हणणे, आक्षेप किंवा कायदेशीर पुरावे सादर करावेत. तसेच वाहनांवरील प्रलंबित मोटार वाहन कर, पर्यावरण कर (लागू असल्यास), तडजोड शुल्क आणि दंड भरून वाहने कायदेशीररीत्या सोडवून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित वाहनांची प्रत्यक्ष पाहणी फलटण शहर पोलीस ठाणे येथे करता येणार आहे.

नोटीसनुसार, विहित १५ दिवसांच्या मुदतीत कर व शुल्काचा भरणा करून वाहने सोडवून न घेतल्यास, लागू कायदेशीर तरतुदींनुसार थकबाकीची वसुली करण्यासाठी वाहनांचा जाहीर लिलाव करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नोंदणीकृत वाहनधारकांच्या दप्तरी असलेल्या पत्त्यावर नोटीस पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले असून, पत्ता बदलल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे वैयक्तिक नोटीस न मिळाल्यास ही जाहीर नोटीस संबंधितांसाठी सूचना मानली जाईल.

ही माहिती सौ. रेणुका राठोड, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, आरटीओ कार्यालय फलटण यांनी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!