फलटण : उद्योजक आणि व्यावसायिकांना एकत्र आणत व्यवसायवाढीसाठी नेटवर्किंग, प्रमोशन, सहकार्य आणि नवीन संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘Business Growth Hub’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे भव्य लॉन्चिंग रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता, हॉटेल अशोका, डेक्कन चौक, फलटण येथे आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी, युवा उद्योजक आणि विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग, फलटण बिल्डर असोसिएशनचे संस्थापक प्रमोद निंबाळकर, शिवजल उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. सचिन भोसले, उद्योजक सागर शहा, जयश्री उद्योग समूहाचे दयानंद पडकर, के. बी. समूहाचे असिस्टंट जनरल मॅनेजर हेमंत खलाटे, ए.व्हि. ज्वेलर्सचे शिवा शहाणे, डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. निनाद दोशी, बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल सस्ते, डॉ. बी.आर. आंबेडकर आए. आए. टी. च्या संचालिका सौ. मनिषा कांबळे, यांच्यासह बी. व्हि. जी. ग्रुपचे चेअरमन हणमंतराव गायकवाड व के. बी. उदयोग समूहाचे संचालक डॉ. सचिन यादव ऑनलाईन द्वारे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात केवळ चांगले उत्पादन किंवा सेवा असणे पुरेसे नसून, ती योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, व्यवसायाचे प्रभावी प्रमोशन करणे आणि योग्य व्यावसायिकांशी नेटवर्क तयार करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने Business Growth Hub हे उद्योजकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून उभे केले जात आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उद्योजक आणि व्यावसायिकांना एकमेकांशी Networking & Business Connections, Business Promotion, Referral, Collaboration, Marketing, Sales, Branding आणि Brand Visibility यांसारख्या माध्यमातून व्यवसायवाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
विशेषतः आपल्या कंपनीची उत्पादने, सेवा, व्यवसाय किंवा नवीन संकल्पना इतर उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे फलटणसह परिसरातील लघु, मध्यम आणि नवउद्योजकांसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या लॉन्चिंग कार्यक्रमात उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स, सेवा क्षेत्रातील व्यावसायिक तसेच नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
‘Connect • Collaborate • Learn • Grow’ या संकल्पनेवर आधारित Business Growth Hub च्या माध्यमातून फलटणच्या व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा आणि उद्योजकांना व्यवसायवाढीसाठी नवे नेटवर्क मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
फलटणमध्ये रविवारी ३० ऑगस्टला ‘Business Growth Hub’चे भव्य लॉन्चिंग
By Team LBNN
On: August 28, 2026 12:47 PM







