सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

६५ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र प्रवासी वाहतूक चालकांना मिळणार १० हजारांचा सन्मान निधी

On: August 30, 2026 11:50 AM
Follow Us:

   ठाणे – धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाच्या सन्मान निधी योजनेंतर्गत १ जानेवारी २०२६ रोजी वयाची ६५ वर्षे पूर्ण झालेल्या तसेच १ जून २०२६ पर्यंत सभासद नोंदणी केलेल्या पात्र सभासदांना १० हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येणार आहे. लाभासाठी पात्र सभासदांनी मंडळाच्या ananddighekalyankarimandal.org या अधिकृत संकेतस्थळावर बँक खात्याची आवश्यक माहिती तातडीने ऑनलाइन भरावी.

सन्मान निधीचा धनादेश वितरण कार्यक्रम ३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. पात्र सभासदांनी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. उपस्थिती सुनिश्चित करण्यासाठी संबंधित RTO/DY RTO यांच्याकडे आपली उपस्थिती नोंदवावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ यांनी केले आहे.

हे ही वाचा  जयपूरमध्ये आंदोलनादरम्यान अभिजीत दिपके यांच्यावर हल्ला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!