सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा ६ ऑक्टोबरला संगमनेर येथे

On: September 30, 2026 8:56 PM
Follow Us:

फलटण –  सर्व शाखीय सोनार समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी अमृता लॉन्स, घुलेवाडी फाटा, संगमनेर, जि. अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आला आहे.

या वधू-वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन श्री क्षेत्र आळंदी येथील रामायणाचार्य ह. भ. प. साध्वी वैष्णवी दीदी सरस्वती, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे आणि संगमनेर येथील प्रसिद्ध सराफ दत्तात्रय मैड यांच्या हस्ते होणार आहे.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुवर्ण नागरी सहकारी पतसंस्था, संगमनेरचे चेअरमन विजयकुमार डहाळे हे भूषविणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून नाशिकचे पुरवठा निरीक्षक डॉ. वेदांत राजेंद्र कपोते उपस्थित राहणार आहेत.

सकाळी १० वाजता सुरू होणाऱ्या या वधू-वर परिचय मेळाव्याचा लाभ सुवर्णकार समाजातील इच्छुक वधू-वरांनी घ्यावा, असे आवाहन श्रीमती मीनाताई सोनार, सौ. अनिता शहाणे, श्रीमती गीताताई नवसे, सुरेखाताई लोळगे, स्वातीताई मुंडलिक, सौ. माधुरीताई माळवे, सौ. जयाताई कुलथे, सौ. अनिताताई दारवेकर, तसेच भगवान शहाणे, गोपाळ कुलथे, संदीप उदावंत, श्रीकांत जोजारे, बबनराव कुलथे, रवी माळवे, संग्राम मयूर, राजेंद्र कुलथे, मनोज पळसकर, योगेश शहाणे आदींनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

आणखी वाचा

error: Content is protected !!