फलटण : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गजानन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. श्री. सचिन भैय्या सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी फलटण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहर अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. पंकज पवार, तसेच सामाजिक कार्यकर्ते अमीरभाई शेख, सिकंदर डांगे, अशोकराव भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मनोहर गायकवाड, ताजुद्दीन बागवान, बालमुकुंद भट्टड, बालमभाई शेख, लक्ष्मण तात्या शिंदे, अल्ताफ पठाण, अजय इंगळे, विकास ननावरे, मंजेखान मेटकरी, नितीन जाधव, धनंजय गोरे, अमोल नलवडे, प्रमोद शहा, पोपट शिंदे, संतोष बाचल, हारून इनामदार, मनमोहन बरसावडे, भारत अहिवळे आदी उपस्थित होते.
महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिवादन करत उपस्थितांनी सत्य, अहिंसा आणि सामाजिक ऐक्याचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त फलटण काँग्रेसकडून अभिवादन
By Team LBNN
On: October 2, 2026 12:09 PM












