सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

ऑक्टोबर आला काय आणि हा पाऊस अचानक कुठे गायब झाला?

On: October 5, 2026 1:50 PM
Follow Us:

    काही दिवसांपूर्वीपर्यंत आकाशात ढग, अधूनमधून पावसाच्या सरी आणि पावसाळी वातावरण होतं. पण ऑक्टोबर सुरू झाला आणि अचानक चित्रच बदललं. पाऊस कुठे गायब झाला? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.

महाराष्ट्रातून यंदा मान्सूनची माघार अपेक्षेपेक्षा लवकर सुरू झाली आहे. साधारणपणे ऑक्टोबरच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात मान्सून माघारी फिरतो; मात्र यंदा माघारीची प्रक्रिया तुलनेने लवकर झाली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये संपूर्ण मान्सून हंगामात पावसाची तूटही नोंदवली गेली आहे.

यामागे El Nino हा घटकही महत्त्वाचा ठरतोय. प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान वाढल्यामुळे विकसित होणारी ही हवामानस्थिती भारतीय मान्सूनवर परिणाम करू शकते. सध्या El Nino मजबूत होत असल्याचे आंतरराष्ट्रीय हवामान निरीक्षणांतून समोर आले आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रत्येक पावसाळी बदलाचे कारण फक्त El Nino आहे, असे सरळ म्हणणे योग्य ठरणार नाही.

खरं तर यंदाच्या पावसाने एक वेगळाच अनुभव दिला. काही ठिकाणी कमी पाऊस, तर काही ठिकाणी कमी कालावधीत जोरदार पाऊस म्हणजे पावसाचे प्रमाणच नाही, तर त्याचे वितरणही महत्त्वाचे ठरले.

आता ऑक्टोबरमध्ये पाऊस कमी झाला म्हणून लगेच दुष्काळाची भीती व्यक्त करण्यापेक्षा पुढील काही महिन्यांसाठी पाणी नियोजन किती महत्त्वाचे आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

कारण पाऊस थांबतो तेव्हा त्याचा परिणाम फक्त हवामानावर होत नाही. शेतकरी, पिके, धरणांमधील पाणीसाठा, भूजल आणि पुढील उन्हाळ्यातील पाण्याची उपलब्धता या सगळ्यांवर त्याचा परिणाम होतो.

हवामान बदलत आहे की आपण बदलत्या हवामानाकडे पाहण्याची पद्धत बदलायला हवी आहे, हा प्रश्नही आता महत्त्वाचा झाला आहे.

कदाचित येणारा काळ यापेक्षा भयानक असु शकतो त्यामुळे वेळीच उपाययोजना केल्या जाव्यात…

क्रांती शेलार, नाशिक

हे ही वाचा  मार्केटमध्ये केबी चे नवे उत्पादन 'मायकोरिस'

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!