सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

मुधोजी कॉलेजमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा: “ग्रंथवाचन ही काळाची गरज” – प्रा. डॉ. सीता जगताप

On: October 16, 2026 7:22 PM
Follow Us:

फलटण:फलटण एज्युकेशन सोसायटीच्या येथील ‘मुधोजी कॉलेज’मध्ये पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि विवेकवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात “ग्रंथवाचन: काळाची गरज” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम हे होते. तर मुख्य अतिथी व वक्त्या म्हणून इंग्रजी विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक प्रा. डॉ. सीता चंद्रशेखर जगताप उपस्थित होत्या. तसेच व्यासपीठावर प्रो.डॉ. प्रभाकर पवार, प्रो . डॉ. ए. एन . शिंदे, प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. सौ. गौरी गायकवाड हे उपस्थिती होते.
वाचनामुळेच मानवी व्यक्तिमत्त्वाचा आणि समाजाचा विकास होतो, असे सांगून,आपल्या प्रमुख मनोगतात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. सीता जगताप म्हणाल्या की, “आजच्या डिजिटल युगात इंटरनेट, सोशल मीडिया (इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप) यामुळे मानवी जीवन वेगाने बदलत आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात आपल्याला हवी ती माहिती सहज उपलब्ध होते, परंतु त्या माहितीचे सखोल ज्ञानात रूपांतर करण्यासाठी आणि विचारांची क्षमता वाढवण्यासाठी ग्रंथवाचनाला पर्याय नाही. सध्या वाचनाची संस्कृती आणि सवय लोप पावत चालली आहे, जे मानवी बौद्धिक विकासासाठी घातक आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व यांच्यासारखे अनेक जागतिक कीर्तीचे विविध क्षेत्रातील दिग्गज तासन-तास वाचन करायचे.म्हणून ते अनेक चांगले बदल घडवू शकले, वाचनाने मानवाला बुद्धिमत्ता, समृद्ध शब्दसंग्रह आणि विचारांची व्यापकता मिळते. गुलामगिरी व अज्ञानाच्या पाशातून मुक्ती मिळवण्यासाठी वाचन हेच सर्वात मोठे साधन आहे. त्यामुळे प्रत्येकाने वाचन संस्कृती जोपासली पाहिजे.”  वाचनामुळे नैतिक उंची, ज्ञानवृद्धी, संवादकौशल्य, लोकसमाज जिवनानुभूती, बौद्धिक विकास, संवेदनशीलता इ.वाढ होऊन व्यक्तिमत्वविकास होतो. मशीनला भावना नसतात, माणसाला भावना असतात, म्हणून मशीन आणि मानवी क्षमतेतला फरक समजून घेतला पाहिजे, रेडिमेड गोष्टी व अपुरे ज्ञान हानिकारक असून मानवी सृजनशीलतेचा नाश करतील, त्यासाठी बुद्धीचा वापर केला पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्ता व तस्सम साधने निद्रानाश करून आरोग्य धोक्यात आणतात. म्हणून विध्यार्थ्यानी ग्रंथ, शब्दकोश, नियतकलिके, वृतपत्रे, भाषज्ञान, भाषाप्रभुत्व यांचे मुळातून सखोल वाचन करून मानवी जीवनाच्या समृद्धीची  दिवसेनदिवस वाढ केली पाहिजे.ग्रंथांच्या सहवासानेच विचारांना परिपक्वता येते
असेही त्या म्हणाल्या.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य प्रो. डॉ. पी. एच. कदम यांनी सांगितले की,वाचन हे केवळ परीक्षेपुरते मर्यादित न ठेवता ते जीवन समृद्ध करण्याचे माध्यम बनवले पाहिजे. वाचनामुळे माणसाची आकलनशक्ती, व निर्णयक्षमता वाढीस लागते.आजच्या तरुण पिढीने पुस्तकांशी मैत्री करून ज्ञानाची समृद्धी मिळवणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथ व ग्रंथालये यांची मैत्री केली पाहिजे.आपण टाइमपास करत नाही तर टाईमच आपणाला पास करत असतो, विध्यार्थ्यानी हे लक्षात घेऊन विविध महापुरुषांची चरित्रे वाचली पाहिजेत.
कार्यक्रमाची सुरुवात  उपस्थितांच्या हस्ते प्रतिमापूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रो. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले. त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व व मराठी विभागाच्या उपक्रमांची माहिती देऊन, प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक प्रा.डॉ. प्रभाकर पवार व प्रा.डॉ.अशोक शिंदे, तसेच सह-संयोजिका प्रा. शैला क्षीरसागर आणि डॉ. गौरी गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राला,, मोटिवेटिव्ह विचारांच्या १६ पुस्तकांचा संच मा. प्राचार्य प्रो.डॉ. पी. एच. कदम यांनी केंद्रप्रमुख प्रा. गिरीश पवार यांना सुपूर्त केला.कार्यक्रमास महाविद्यालयातील एड.डॉ.ए. के.शिंदे,डॉ.रवींद्र काळेबेरे,प्रा. अनुप गोडसे,प्रा.ज्योती काळेल मॅडम डॉ.मठपती मॅडम,प्रा.कु.निलाक्षी निकाळजे मॅडम,प्रा.वैष्णवी गायकवाड,प्रा.ललित वेळेकर,’साथी मानवतेचा’,या साप्ताहिकाचे संपादक श्री.शकील सय्यद यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विध्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे ही वाचा  मुधोजी महाविद्यालयात रंगणार शिवाजी विद्यापीठाचा ४६ वा मध्यवर्ती युवा महोत्सव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!