सातारा जिल्हा राजकीय क्राईम क्रिडा निवडणूक प्रशासकीय सामाजिक संपादकीय देश विदेश राशि भविष्य मनोरंजन शेती आरोग्य विषयक इतर

---Advertisement---

‘चुकीचा निर्णय घेतल्यास भावी पिढीचे नुकसान’; जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारासाठी मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मैदानात

On: October 18, 2026 12:21 PM
Follow Us:

फलटण : मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काल फलटण येथे पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवार आमदार जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक व पदवीधर उपस्थित होते. बैठकीला श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव तथा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रतिनिधी सचिन सूर्यवंशी बेडके, फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी बेडके, नामदेव पाटील आप्पा, सुरेश जाधव, अच्युतराव खलाटे, नगरसेवक सौरभ तात्या पाटील, नगरसेवक पंकज पवार, पत्रकार रवींद्रजी बेडकीहाळ, पत्रकार अरविंद मेहता यांच्यासह फलटणमधील पत्रकार उपस्थित होते.

यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, हर्षदा देशमुख-जाधव या प्रभाकर देशमुख यांच्या कन्या आहेत. प्रभाकर देशमुख आणि मी एका दिवसात ५,००० बंधाऱ्यांचे पूजन केले आहे. हर्षदा देशमुख यांचे बालपण प्रशासकीय छायेत गेले आहे. पाच जिल्हे आणि ५८ तालुके असलेला हा मतदारसंघ आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे मोदी सरकारलासुद्धा झुकते माप घ्यावे लागले आणि विद्यार्थ्यांच्या शक्तीपुढे शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. चुकीची व्यवस्था निर्माण होण्यास निवडून गेलेल्या प्रतिनिधींचा कारभार कारणीभूत ठरतो. SIR मतदार यादी प्रकरणात प्रचंड मोठा घोटाळा सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात विविध आंदोलने सुरू असून, या आंदोलनांना जात आणि धर्माचे बंधन नाही. प्रत्येक स्पर्धा परीक्षेत पेपरफुटी होत असून, हे पेपर दोन-दोन कोटी रुपयांना संस्था चालकांना विकले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. ग्रामीण भागातील विद्यार्थी अनेक अडचणींचा सामना करून शहरात शिक्षणासाठी येतात. मात्र, अशा प्रकारांमुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे. मतदार यादीतून नावे वगळली जात असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. शिक्षण व्यवस्था मजबूत असणे आवश्यक आहे. सरकारने केवळ रस्त्यांच्या कामांवर लक्ष केंद्रित न करता इतर महत्त्वाच्या प्रश्नांकडेही लक्ष दिले पाहिजे. रस्त्यांच्या कामांतून ४० टक्के कमिशन घेतले जात असल्याचा आरोपही त्यांनी सत्ताधारी पक्षावर केला. आपण चुकीचा निर्णय घेतला, तर भावी पिढीचे नुकसान होईल. देशातील एकूण लोकसंख्येतील पदवीधरांचे प्रमाण केवळ दीड टक्के असल्याचे सांगत शिक्षक व पदवीधरांनी योग्य निर्णय घ्यावा आणि महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार विजयी करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी महेंद्र सूर्यवंशी बेडके म्हणाले की, गोविंद वाघ यांनी शिक्षक मतदारसंघातून पुणे विभागासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, आमदार जयंत आसगावकर यांनाही शब्द दिला असल्याने नाइलाजाने गोविंद वाघ यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते गोविंद वाघ यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात त्यांना कुठे ना कुठे संधी देण्यात येईल, असा शब्द महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी दिला. बैठकीच्या शेवटी नगरसेवक पंकज पवार यांनी आभार मानले.

हे ही वाचा  माझी बदली झालेली नाही – तुकाराम मुंढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
error: Content is protected !!